करमाळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

करमाळा(दि.१०): करमाळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षणाची सोडत नुकतीच बुधवारी (दिनांक ८ ऑक्टोबर) पारदर्शकपणे जाहीर करण्यात आली. ही सोडत शहरातील किल्ला वेस येथील बहुउद्देशीय सभागृहात उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अंजली मरोड यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

या सोडतीत करमाळा नगरपरिषदेच्या वीस सदस्यांसाठी दहा प्रभागांतून प्रत्येकी दोन सदस्यांची निवड होणार असून, त्यासाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय विभागवारी व आरक्षण
प्रभाग क्रमांक : १
आरक्षण : (अ) सर्वसाधारण महिला (ब) सर्वसाधारण
परिसर : कानडे वस्ती, सुमंतनगर, कुंभारवाडा, किल्ला वेस, मोहल्ला.. लोकसंख्या: 2517
प्रभाग क्रमांक : २
आरक्षण : (अ) सर्वसाधारण महिला (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
परिसर : हिरडे प्लॉट, सावंत गल्ली, मार्केट यार्ड, मोहिद्दीन तालीम, वेताळपेठ (उत्तर), मेन रोड, पोथरे नाका, घोडेपिर मैदान. लोकसंख्या: 2191

प्रभाग क्रमांक : ३
आरक्षण : (अ) सर्वसाधारण महिला (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
परिसर : मंगळवार पेठ, जुना बायपास रोड, गुजर गल्ली, चांदगुड गल्ली, रावळ गल्ली, भवानी पेठ, दत्त पेठ (उत्तर). लोकसंख्या: 2190
प्रभाग क्रमांक : ४
आरक्षण : (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण
परिसर : चांदगुडे गल्ली, कुंभार प्लॉट, कृष्णाजी नगर, गणेश नगर, फंड गल्ली, दत्त पेठ (दक्षिण). लोकसंख्या: 2511
प्रभाग क्रमांक : ५
आरक्षण : (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण
परिसर : फंड गल्ली, सुतार गल्ली, कसाब गल्ली, कानाड गल्ली, पुणे रोड (उत्तर बाजू). लोकसंख्या: 2295

प्रभाग क्रमांक : ६
आरक्षण : (अ) अनुसूचित जाती महिला (ब) सर्वसाधारण
परिसर : वेताळ पेठ (दक्षिण), राशीन पेठ (उत्तर), अण्णाभाऊ साठे नगर, खडकपुरा, कुंकू गल्ली. लोकसंख्या: 2263
प्रभाग क्रमांक : ७
आरक्षण : (अ) अनुसूचित जाती महिला (ब) सर्वसाधारण
परिसर : राशीन पेठ (दक्षिण), कानाड गल्ली, पेट्रोल पंप परिसर, भीमनगर, खंडक रोड, महात्मा गांधी हायस्कूल परिसर. लोकसंख्या: 2483
प्रभाग क्रमांक : ८
आरक्षण : (अ) सर्वसाधारण महिला (ब) सर्वसाधारण
परिसर : किल्ला विभाग, रंभापुरा, माने प्लॉट, जाधव प्लॉट, सुमंतनगर (पश्चिम), झोपडपट्टी क्षेत्र लोकसंख्या: 2119

प्रभाग क्रमांक : ९
आरक्षण : (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण
परिसर : एस.टी. स्टँड, पोलीस लाईन, तहसील कार्यालय, विद्यानगर, शिवाजीनगर, महेंद्रनगर, कॉटेज हॉस्पिटल परिसर. लोकसंख्या: 2124
प्रभाग क्रमांक : १०
आरक्षण : (अ) अनुसूचित जाती (ब) सर्वसाधारण महिला
परिसर : सिद्धार्थ नगर, नगरपालिका कर्मचारी वसाहत, जिल्हा परिषद विश्रामगृह, मौलाली माळ, सात विहिर परिसर, मुथा प्लॉट लोकसंख्या: 2506
मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी गुरुवार, ९ ऑक्टोबर ते मंगळवार, १४ ऑक्टोबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आला आहे. हरकती संबंधित प्रभाग कार्यालयात किंवा मुख्याधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करता येतील.


