खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेध- डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन -

खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेध- डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी करमाळा, ता.२६: मुंबई  येथे पत्रकारांना देण्यात आलेल्या शिव्या  व धमकी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, करमाळा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रणजीत  माने
यांच्यावतीने  ए.पी. आय  श्री.दिलीप ढेरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात खा. संजय दिना  पाटील यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, राज्य महासचिव विकास भोसले तसेच जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून संबंधित खासदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संघटनेने संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, तसेच भविष्यात पत्रकारांना धमकावणे, अपमानित करणे किंवा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर तालुका अध्यक्ष दिनेश मडके, उपाध्यक्ष सूर्यकांत होनप, संजय साखरे, सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिव तुषार जाधव, तालुका संपर्क प्रमुख नंदकिशोर वलटे, प्रवक्ता नितीन झिंजाडे ,कार्यवाह रवींद्र विघ्ने, सहकार्यवाह आनंद माळी ,तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन चव्हाण, मार्गदर्शक सल्लागार नासीर कबीर, ॲड. बाबुराव हिरडे, अशोक नरसाळे, राजाराम माने यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!