चिखलठाणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करू – नारायण पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : चिखलठाण गावच्या विकासासाठी सर्व मतभेद बाजुला ठेवून गावपातळीवर कार्यकर्त्यांनी केलेल्या युतीस ग्रामस्थांनी भरभरून पाठींबा दिला असून, विरोधी पॅनलचा दारूण पराभव केला आहे. जेवढ्या विश्वासाने नागरीकांनी आम्हांस सहकार्य केले आहे. तेवढ्याच विश्वासाने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन पाटील गटाचे नेते व माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी दिले आहे.
चिखलठाण ग्रामपंचायत निवडणुकीत बागल-पाटील युतीचा विजय झाला असून, विजयी झालेल्या नूतन सरपंच धनश्री विकास गलांडे, उपसरपंच राजाबाई शिवाजी मारकड, सदस्य हेमंत बारकुंड, ठकूबाई चव्हाण, योगेश सरडे, संभाजी कांबळे, आनंद पोळ, मनिषा जाडकर, अक्षय सरडे, सुमन गव्हाणे, गोजरबाई सरडे या नूतन सदस्यांचा सत्कार समारंभ व युवक नेते पै. विरेंद्रप्रताप विकास गलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून श्री. पाटील बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेटफळ येथील ह.भ.प. विठ्ठल पाटील महाराज हे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, आदिनाथचे माजी संचालक केरू गव्हाणे, धुळाभाऊ कोकरे, चिखलठाण सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे, माजी चेअरमन महादेव कामटे, राजुरीचे आबासाहेब टापरे, धनाजी मारकड, चंद्रकांत सुरवसे, दिनकर सरडे (मकाई, संचालक), बाळासाहेब कोकरे, विठ्ठल कांबळे, प्रमोद गव्हाणे, विनोद चव्हाण, राजेंद्र कुचेकर, सचिन क्षीरसागर, मा.सभापती अतुल पाटील आदी जण उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले, की चिखलठाण ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वासने सरपंच व सदस्य पूर्ण करतील. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना वरीष्ठ पातळीवरून मदत करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा नियोजन मंडळ या माध्यमातून गावासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देऊ. याशिवाय श्री कोटलिंग मंदिरासाठी भाविकांना सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
विकासकामात कोणताही दुजाभाव न करता व राजकारण न आणता आम्ही गलांडे यांना मदत करू; असेही आश्वासन श्री. पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करून दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सरपंच धनश्री गलांडे यांना मदत करू. निवडणुकीत आम्ही रस्ते, वीज, पाणी, गटार, स्वच्छता मोहिम याबरोबरच क्रिडा संकुल, कोल्डस्टोअरेज, आधुनिक अभ्यासिका आदी दिलेली आश्वासन पण करण्यासाठी प्रयत्न करू यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे, माजी सभापती अतुल पाटील यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमास कुगावचे सरपंच सागर पोरे, उपसरपंच दादासाहेब डोंगरे, सोगावचे सरपंच विनोद सरडे, केडगावचे माजी सरपंच डॉ. शहाजी कानगुडे, कुगावचे माजी उपसरपंच इन्नुस सय्यद तसेच संजीवन बोराडे, मच्छिंद्र सरडे, साहेबराव मारकड, शिवाजी मारकड, सर्जेराव मारकड, समाधान गव्हाणे, पप्पू गव्हाणे, संजय गव्हाणे, बिभिषण गव्हाणे, फिरोज तांबोळी, दिलीप दुबळे, अर्जुन टिंगळे, रंगनाथ रोकडे, रंगनाथ पवार, भारत पवार, जयराम गुंजाळ, दत्तात्रय बारकुंड, श्रीनाथ गव्हाणे, नवनाथ सरडे, प्रथमेश उंबरे, विठ्ठल सरडे, आबा मारकड, जगन्नाथ गलांडे, राहुल गोळे, शिवाजी सरडे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पप्पू गव्हाणे यांनी केले तर आभार हेमंत बारकुंड यांनी मानले.