पिकांचे पंचनामे सरसकट करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा – संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका यांची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर 2022 या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली असून सदर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, सदर शासनाने बऱ्याच भागात ज्या ठिकाणी 65 MM पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे पिकांचे पंचनामे न करता संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळावी असे निवेदन नायब तहसीलदार बदे यांना देण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अशाच भागात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतू करमाळा तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर 2022 या दोन महिन्यात दररोज संतधार पाऊस पडत आहे या मुळे नागरिकांना शेतीची कामे व शेतीमधील सर्व पिकांची उदा.केळी ,ऊस, कापूस, सोयाबीन,सूर्यफूल, कांदा ,उडीड, तूर, मका अशा प्रकारच्या पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड जि. उपअध्यक्ष शंकर पोळ, जि. संघटक गणेश सव्वासे, ता.अध्यक्ष अमित घोगरे , ता.कार्याध्यक्ष राजेश ननवरे , शहर अध्यक्ष वैभव माने , कृष्णा बोराडे, अशोक आदलिंग ,अजित गोसावी, अशोक अडसूळ, शकील शेख, इ उपस्थित होते.