प्रा.दादासाहेब मारकड यांना पीएच.डी.प्रदान - Saptahik Sandesh

प्रा.दादासाहेब मारकड यांना पीएच.डी.प्रदान

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.13:
विहाळ (ता.करमाळा) येथील रहिवासीअसलेले व सध्या राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय येथे भूगोल विभागात कार्यरत असलेल्या प्रा. दादासाहेब मारकड यांना संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे.

“आळंदी या धार्मिक पर्यटन स्थळाचा भौगोलिक अभ्यास” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांनी या विषयावर सखोल अभ्यास करून संशोधन ग्रंथ सादर केला त्यास विद्यापीठाचे तज्ञसमितीने मान्यता देत “विद्यावाचस्पती” ही पदवी प्रदान केली आहे. प्रा. डॉ.ओमप्रकाश मुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील डॉ.हरिष लांजेवार रेफ्री होते.

प्रा.मारकड यांनी शिवायन, पद्मावती, ज्ञानविजय, ओवीबद्ध श्रीमद्भागवत, मानवी भूगोल, पर्यटन भूगोल अशा विविध ग्रंथांचे लेखन केले असून त्यांच्या ओवीबद्ध ग्रंथांचे गावोगावी वाचन, निरूपण आणि पारायण केले जाते. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल विहाळ ग्रामस्थांनी तसेच यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे-पाटील व ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डाॅ.बाबूराव हिरडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तर राजगुरु महाविद्यालयाचे संस्थापक संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे-पाटील यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

Prof. Dadasaheb Markad was awarded Ph.D | Vihal Karmala Solapur News | Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!