संभाजी ब्रिगेड सर्व निवडणूका लढवणार : सौरभ खेडेकर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आगामी काळात संभाजी ब्रिगेड सर्व निवडणूका सक्षमपणे लढवणार असून, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे; असा आदेश संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिला.
करमाळा येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. खेडेकर बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा संपर्क प्रमुख अभिमन्यु पवार, राज्य संघटक मनोज गायकवाड, रा. का. सदस्य दिनेश जगदाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक नागेश माने, मराठा सेवा संघाचे माजी तालुका अध्यक्ष अतुल वारे, संस्थापक सदस्य काळे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे अजित कणसे, वीर सर, शितोळे सर, गोरे गुरूजी, शंकर पोळ, जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, तालुका अध्यक्ष अमित घोगरे, शहराध्यक्ष वैभव माने, सचिव गणेश डोके, तालुका कार्याध्यक्ष राजेश ननवरे, विशाल पाटील, दादासाहेब तनपुरे, शेटफळ शाखाप्रमुख नानासाहेब नाईकनवरे, विवेक पोळ, भाग्यवंत पोळ, महेश गोडसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.खेडेकर म्हणाले, की राज्यभरात विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता तसेच सत्ताधाऱ्यांवर रोष असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन संभाजी ब्रिगेड मैदानात उतरणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अतुल वारे यांनी केले तर आभार अजित कणसे यांनी मानले.