श्री खोलेश्वर महादेव रथाची १५ ऑगस्टला सवाद्य मिरवणूक - Saptahik Sandesh

श्री खोलेश्वर महादेव रथाची १५ ऑगस्टला सवाद्य मिरवणूक

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील किल्ला वेस येथील श्री खोलेश्वर महादेव रथाची सवाद्य मिरवणूक सोमवारी 15 ऑगष्टला दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे.अशी माहिती श्री खोलेश्वर आरती मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रथाची मिरवणूक काढण्यात आली नव्हती, परंतु सालाबाद प्रमाणे ह्यावर्षी श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी 15 ऑगष्टला दुपारी 12 वाजता किल्ला वेस येथील श्री खोलेश्वर महादेव मंदिरापासून किल्ला वेसेतुन ही रथाची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक करमाळा शहरातील मुख्य मार्गावरून पुन्हा किल्ला वेस येथून मंदिरात विसर्जन केले जाते. याप्रसंगी अनेक भक्त रथ ओढण्यासाठी व दर्शनासाठी रांगा लावतात. तरी मिरवणुकीत सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीखोलेश्वर आरती मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!