घारगावचे संजय सरवदे यांना कोविड योद्धा पुरस्काराने केले सन्मानित

Sanjay Sarwade

करमाळा : कोविड-19 महामारीच्या काळामध्ये कोरोना विरोधी लढाईत प्रत्यक्ष भाग घेऊन काम केल्याबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहा तर्फे घारगाव (ता.करमाळा) चे संजय सरवदे यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोना काळामध्ये covid-19 विशेष पोलीस अधिकारी म्हणून संजय सरवदे यांनी उत्कृष्ट काम केले. गोरगरिबांना धान्याचे वाटप, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटप व गोरगरिबांना जेवण वाटप, कोरोना विषयी जन जागृती , हॉस्पिटलमध्ये पेशंटला मदत अशा अनेक प्रकारच्या सेवा बजवल्यामुळे सरवदे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

यावेळी संजय सरवदे यांनी कोरोना काळात केलेल्या सेवेबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियासमूह तर्फे डॉ. उज्वला हाके प्रदेश अध्यक्ष भटक्या विमुक्त भाजपा आघाडी अँड. महेश दादा देवकते सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस विश्वजीत दादा खेमनर, युवा उद्योजक कुंडलिक कायगुडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अभिमन्यू उघडे, अनिल आप्पा धायगुडे, महादेव वाघमोडे, मुकुंद कुचेकर, राहुल कुदनर, मुख्य संपादक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज अशोक नरूटे, पुणे जिल्हा प्रतिनिधी यांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Sanjay Sarvade of Ghargaon was Honored with the covid Yoddha Award | Ghargaon | karmala news | Sarwade

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!