शेतातील पत्र्याच्या शेडची चोरी – शेड उभारतानाच झाली चोरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.25) : करमाळा-वीट रस्त्यावर पत्र्याचे शेड उभारण्याचे काम चालू असतानाच चोरट्यांनी पत्रे चोरून नेले आहेत. हा प्रकार 21 सप्टेंबर च्या मध्यरात्री घडला आहे. यात सौ.पल्लवी विजय चव्हाण (वय 40 वर्षे धंदा शेती रा. खडकपुरा करमाळा) यांनी फिर्यादी दिली.
त्यात त्यांनी म्हटले की आम्हाला वीट हद्दीचे शिवारात 8 एकर शेतजमीन आहे. तेथे आमचे शेतामध्ये सावलीसाठी पत्रयाचे शेड मारायचे काम चालु होते. तेथे मी माझी कुल्फीची गाडी रोडचे कडेला लावुन कुल्फी विक्री करत असते. 21/09/2022 रोजी मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे 06/00 वाचे सुमारास कुल्फी गाडी बंद करुन पत्राशेडची पाहणी करुन करमाळा येथे घरी आले.
त्यानंतर 22 सप्टेंबरला आम्ही नेहमी प्रमाणे घरातील कामे आटपुन सकाळी 11/00 वाजता कुल्फीची गाडी घेवुन आमचे शेताजवळ गेलो व माझी कुल्फीची गाडी लावुन मी पत्राशेड कडे गेले असता मला त्या ठिकाणी आम्ही मारलेले पत्रा शेडचे पत्रे दिसुन आले नाही.त्यानंतर मी आजुबाजुस पत्राचा शोध घेतला असता पत्रे सापडले नाही. तेव्हा आमची खात्री झाली की, आमचे शेतातील पत्रयाचे शेडचे पत्रे कोणीतरी अज्ञात चोरटयानी चोरुन नेले आहेत. ते 9000/- रू टाटा कंपनीचे सिल्व्हर रंगाचे एकुन 12 पन्हाळी लोखंडी पत्रे होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढीलतपास सुरु आहे.