केम केंद्रात विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न – विद्यार्थ्यांनी सादर केली विविध वैज्ञानिक उपकरणे
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : काल(दि.२२) रोजी करमाळा तालुक्यातील 17 केंद्रामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये लहान गटातून इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटातून 40 उपकरणे आलेली होती. त्यामध्ये 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . मोठा गट म्हणजेच इयत्ता 6 वी ते 10 वी मधून 20 उपकरणे आलेली होती. त्यामध्ये 33 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अशा एकूण 103 विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविला. परीक्षक म्हणून मंगेश सोलापुरे, अनिल पाटील, आबा लोंढे यांनी काम पाहिले.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून सायन्स वॉल हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून करमाळा तालुक्यामध्ये सुरू आहे. त्याला काल(दि.२२) रोजी एक वर्ष पूर्ण होत झाले. यानिमित्ताने हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.
लहान गटामधून पुढील विद्यार्थ्यांची निवड झाली –
प्रथम क्रमांक – उत्कर्ष सतीश तळेकर
इयत्ता तिसरी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केम
प्रयोगाचे नाव- व्हक्युम क्लिनर
द्वितीय क्रमांक -पवन अण्णासाहेब गुरव इयत्ता पाचवी
शाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी
उपकरणाचे नाव -डीजे निर्मिती
तृतीय क्रमांक -प्रसाद विठ्ठल रेंगे
इयत्ता तिसरी
शाळा – जि प प्राथमिक केंद्र शाळा केम
उपकरणाचे नाव- चारुदर्शी
मोठ्या गटामधून पुढील विद्यार्थ्यांची निवड झाली
प्रथम क्रमांक – ओंकार भीमराव तनपुरे व ग्रुप
शाळा – छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे उपकरणाचे नाव -गवत छाटणी यंत्र
द्वितीय क्रमांक- पृथ्वीराज रमेश जाधव व ग्रुप
शाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी
उपकरणाचे नाव -प्रदूषण निर्मूलन संयंत्र
तृतीय क्रमांक -संघराज अशोक ओहोळ शाळा – नूतन माध्यमिक विद्यालय केम उपकरणाचे नाव- रूम हीटर
वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे व केंद्रातील सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी यश कल्याणी संस्था करमाळ्याचे संस्थापक श्री गणेश करे पाटील यांच्या वतीने सर्व सहभागींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी करमाळा पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी श्री सोलापूरे व करमाळा तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री वाडेकर साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहाय्य केले.
केम केंद्रामधील विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार श्री बदे, केमचे मंडल अधिकारी श्री. खारव, केम ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी नलवडे भाऊसाहेब. केम पी एच सी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री प्रदीप पाटील, केमचे सरपंच आकाश भोसले,केम केंद्रातील सर्व मुख्याध्यापक/शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाले.