राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत कंदर येथील भांगे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे सुयश.. - Saptahik Sandesh

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत कंदर येथील भांगे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे सुयश..

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे ..

कंदर : प्रज्ञाशोध परिक्षेचा राज्यस्तरीय निकाल लागला असून त्यामध्ये श्री.शंकरराव भांगे (मालक) प्राथमिक विद्यामंदिर कंदर या प्रशालेतील इयत्ता दुसरीतील वरदविनायक चंद्रकांत साळवे 96% गुण मिळवून राज्यात व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे तसेच इयत्ता दुसरीतील श्रेयश सागर ननवरे व जाधव प्रणव गणेश 80% गुण मिळवून राज्यात व जिल्ह्यात अकरावा क्रमांक मिळवला आहे व इयत्ता चौथीतील शिवम महेश राखुंडे 282 गुण मिळवून राज्यात आठवा व जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे .तरी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव सुनिल भांगे शाळेच्या मुख्याध्यापिका उबाळे आर.डी.व सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!