महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहू : सुनील बापू सावंत - Saptahik Sandesh

महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहू : सुनील बापू सावंत

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जो उमेदवार देतील त्याचा तन मन धनाने प्रचार करू व महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करु तसेच त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याचें आवाहन महाविकास आघाडी चे आयोजक सुनीलबापू सावंत यांनी केले आहे.


करमाळा तालुका महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक विचार विनिमय आज नालबंद मंगल कार्यालय येथे दुपारी एक वाजता करमाळा विकास सोसायटी चे चेअरमन मनोज गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महाविकास आघाडी चे आयोजक सुनील बापू सावंत, पंढरपूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव मोरे माण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय जगताप माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजय जगताप शिवसेनेचे शहरप्रमुख संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील राष्ट्रवादीचे महाराष्ट्र कार्यकारिणी प्रांतीक सरचिटणीस गोवर्धन चवरे पाटील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रविण कटारिया जिल्हा उपप्रमुख शाहुदादा फडतरे सोलापूर जिल्हा काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस हरीभाऊ मंगवडे जिल्हा काॅग्रेस चे उपाध्यक्ष फारुक जमादार, महीला आघाडीच्या नेत्या सविताताई शिंदे, महीला अध्यक्षा नलिनी जाधव रा,काॅ, चे शहर उपाध्यक्ष आझाद शेख, भारिप बहुजन चे देवा लोंढे,नगरसेवक संजय सावंत नगरसेवक रवींद्र कांबळे नगरसेवक दिपक सुपेकर, नगरसेवक गोविंद किरवे,एल.डी, कांबळे,रावगाव चे सरपंच संदीप शेळके देवळाली चे सरपंच शिंदे माढा काॅग्रेस आय चे तालुका अध्यक्ष सौदागर जाधव आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाला यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी वांगी चे अर्जुन तकीक, प्रविण कटारिया, हनुमंत मांढरे, सविता शिंदे, चवरे पाटील, सौदागर जाधव हनुमंत मोरे माण चे संजय जगताप, देवा लोंढे आदी जणांनी विचार व्यक्त केले
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे आयोजक सुनीलबापु सावंत म्हणाले की, सध्या देशात हुकुमशाही चालली आहे दिवसा ढवळ्या पोलिस ठाण्यात गोळीबार केला जात आहे विकास कामाच काहीही नाही, फक्त भुल थापा मारून मत घ्यायची हा एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पक्ष रा उच्चबवत आहे गॅस , पेट्रोल, डिझेल,चे दर वाढले आहे महागाई वाढली. नेतेमंडळीना ईडी ची भिती दाखवली जात आहे सत्तेचा पुरेपूर वापर केला जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जो उमेदवार देतील त्याचा तन मन धनाने प्रचार करू व महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करु तसेच त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याचें आवाहन केले.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसाक पठाण यांनी केले तर आभार फारुक जमादार यांनी मानले. यावेळी शिवसेना, युवा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्र पक्ष,काॅग्रेस आय पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!