श्री कमलाभवानी ब्लड बँकेचे रक्तदान शिबिरे घ्या - आमदार सचिन कल्याण शेट्टी - Saptahik Sandesh

श्री कमलाभवानी ब्लड बँकेचे रक्तदान शिबिरे घ्या – आमदार सचिन कल्याण शेट्टी

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात श्री कमलाभवानी ब्लड बँकेची झालेली उभारणी रुग्णांसाठी आधार केंद्र बनली असून ही रक्तपेढी मजबूत करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन करमाळ्यातील रक्ताची गरज करमाळ्यातच भागवावी असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले.

यावेळी ब्लड बँकेचे संचालक दीपक पाटणे स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक महेश चिवटे चेअरमन ब्लड बँक समन्वयक व्हाईस चेअरमन गणेश चिवटे व्यवस्थापक निलेश पाटील यांनी आमदार कल्याण शेट्टी यांचे स्वागत केले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवानंद बागल उपाध्यक्ष प्रशांत नेटके शेअर प्रमुख संजयशीलवंत उपशहर प्रमुख नागेश काळे युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे वैद्यकीय सहाय्यक विनोद महानवर नागेश शेंडगे रोहित रोहित वायबसे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड भाजपचे किरण बोकन जितेश कटारिया सचिन चव्हाण जयंत काळे रामा ठाणे अफसर जाधव फोटोग्राफर कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार कल्याण शेट्टी यांनी ब्लड बँकेची पाहणी करून समाधान व्यक्त केले यावेळी पुढे बोलताना कल्याण शेट्टी म्हणाले की रक्तदान हे जगात सर्वात श्रेष्ठ दान असून सर्व जाती-धर्माचे बंधने तोडून रक्त एकमेकाला देऊन एकमेकाचा प्राण वाचू शकतो यासाठी आता करमाळातील श्री कमला भवानी ब्लड बँक मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असून या भागात जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेऊन या ब्लड बँकेचा पाया मजबूत करावा असे आवाहन केले.

आगामी काळात या ठिकाणी शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे प्रश्न सोडवावेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, या ब्लड बँकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे मोठे सहकार्य लाभले असून येणाऱ्या पंधरा दिवसात करणाऱ्या डायलिसिस सेंटर सुरू करण्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!