गुळसडी येथील ओढ्यात वाहून गेलेला मजूराचा मृतदेह सापडला…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.12) : गुळसडी येथे काल (ता.११) झालेल्या पावसात स्थानिक ओढ्यात एक तरूण वाहून गेला होता, वाहून गेलेला तरूण हा मजूर बीड जिल्ह्यातील नाथापूर तालुक्यातील असून त्याचे नाव अशोक रामदास जाधव (वय-35) असे आहे. तो मजूर आज (ता.१२) सकाळी रस्त्यापासुन जवळच झाडाला अडकलेले मृत शरीर मिळुन आले आहे.
काल सायंकाळी पावणे पाच वाजता जोरदार पाऊस झाला असल्याने सर्व रस्ते, ओढे पाण्याने जोरात वाहत होते, हा मजूर खंडागळेवस्तीजवळच्या झोपडीत रहात होता, पावसातच तो घराकडे येत असताना पाण्याच्या अंदाज न आल्याने तो वाहून गेला. त्याचा तपास काल रात्री मोठा पाऊस असल्याने करता आले नव्हते. पण आज सकाळी पाऊस थांबल्यामुळे पुन्हा शोध सुरु करण्यात आला. अखेर त्याचा मृतदेह एका झाडाला अडलेल्या अवस्थेत सापडला.
या तरुणाचा मृत शरीर झाडाला अडकलेले मिळुन आल्यानंतर परिवाराचे नातेवाईकांना दु:ख अनावर झाले. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश भुजबळ, हवालदार रंदवे, कावळे, पोलिस पाटील धनाजी अडसुळ हे उपस्थित होते. तर त्या मृत शरीराला बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.