ब्रिटिशकालीन डिकसळ पुलावरील खड्डे बुजविण्यास सुरवात

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते डिकसळ ब्रिटिशकालीन रेल्वे पुलावर पावसामुळे पाणी साचून खड्डे पडले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालविताना खूप त्रास सहन करावा लागत होता, त्यासाठी कोंढारचिंचोलीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते देविदास आप्पा साळुंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार करून त्याचा सतत पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे चांगल्या दर्जाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
याचे नागरिकात मधून समाधान व्यक्त होत असून त्यासाठी माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकामचे श्री उबाळे, श्री वाघ, श्री ढेरे, श्री मोलावणे, श्री. सापते यांचे आभार व्यक्त केले आहे.




