स्व.सतीश बागडे यांच्या कुटुंबीयास हुंबेवस्ती व मांजरगावातील तरुणांनी केली ६३ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत.. - Saptahik Sandesh

स्व.सतीश बागडे यांच्या कुटुंबीयास हुंबेवस्ती व मांजरगावातील तरुणांनी केली ६३ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मांजरगाव (ता.करमाळा) येथील कै.सतीश नारायण बागडे यांचे 30 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले ते 40 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर बागडे परिवारावर शोककळा पसरली होती, त्यामुळे हुंबेवस्तीवरील तरुणांनी मांजरगाव व परिसरातील नागरिकांना मदतीचा हात मागितला असता, या परिसरातील नागरिकांनी 63 हजार 400/- रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे.

स्व.बागडे यांच्या पश्चात पत्नी अनिता बागडे एक मुलगा अभिषेक बागडे मुलगी पायल बागडे आई-वडील 3 बंधू असा परिवार आहे. ते नायब सुभेदार व सामाजिक कार्यकर्ते संतोष बागडे (इंडियन आर्मी) याचे बंधू होते.

हि जमा झालेली रक्कम बागडे कुटुंबीयांना देताना याप्रसंगी दत्तात्रय बागडे, रामा बागडे, भैया नलवडे, आजिनाथ बागडे, नवनाथ मोरे , रामा हुंबे, लक्ष्मण हुंबे, शिवाजी मोरे, गणेश हुंबे, रामा काळे, संजय बागडे, नवनाथ चव्हाण, रामा चव्हाण , सागर चव्हाण, रणजीत चव्हाण, अतुल पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!