बिटरगाव (श्री) येथे त्रिदिनी किर्तन महोत्सव संपन्न.. - Saptahik Sandesh

बिटरगाव (श्री) येथे त्रिदिनी किर्तन महोत्सव संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : बिटरगाव (श्री) (ता.करमाळा) येथे त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्त साधत 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव करण्यात आला.

२८ ऑक्टोबरला सकाळी करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. दुपारी पाच ते सहा ह भ प मच्छिंद्र महाराजसाळुंखे खडकी व विलास महाराज शिंदे पोथरे यांचे प्रवचन झाले. पहिल्या दिवशी रात्री नऊ ते 11 ह भ प भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे उत्कृष्ट हरिकीर्तन झाले.

दुसऱ्या दिवशी दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाले. रात्री गायनाचार्य बापूराव महाराज बागल यांचा संगीत मैफलीचा कार्यक्रम झाला. रविवारी सकाळी नगर प्रदक्षिणा होऊन दहा ते बारा ह भ प प्रकाश महाराज साठे यांचे काल्याचे किर्तन होऊन कीर्तन महोत्सवाची सांगता करण्यात आली.

तीन दिवसातील उपस्थित कीर्तनकारांनी प्रपंच करून परमार्थ कसा साधावा व सामाजिक सलोखा कसा राखावा यावर दृष्टांता सहित उत्कृष्ट विवेचन केले. तीन दिवस शिवलीलामृत पारायण करण्यात आले. रविवारी दुपारी बारा वाजता भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील गायक वादक सर्व वारकरी भावीकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

व्यासपीठ चालक म्हणून मृदंगाचार्य नाना महाराज पठाडे उपस्थित होते.
या किर्तन महोत्सवाचे आयोजन बिटरगाव श्री चे सरपंच डॉक्टर अभिजीत मुरूमकर, विष्णू रजपूत, उपसरपंच गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य दौलत वाघमोडे, भूषण दळवी, शिवाजी बोराडे, नंदकुमार दळवी, केशव मुरूमकर सागर शिंदे, अजिनाथ मुरूमकर, अजय बोराडे, गणेश मुरूमकर, वैभव दळवी, मनेश मुरूमकर, विवेक कुलकर्णी, रमेश माने, रविंद्र शिंदे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!