बालविवाहाला उपस्थित राहिल्यास दोन वर्ष कारावास.. - Saptahik Sandesh

बालविवाहाला उपस्थित राहिल्यास दोन वर्ष कारावास..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागात तर कमी वयातच लग्नाचा बार उडवून देण्यात येतो. परंतू अशा लग्नाला उपस्थित राहत असलेल्या वऱ्हाडी मंडळींनाही ते चांगलेच अंगलट येणार आहे. अशा लग्नाला उपस्थित राहिल्यास संबंधित कुटूंबियासह वऱ्हाडी मंडळींनाही शिक्षा होणार आहे.

ग्रामीण भागात मुलगी आणि मुलगा वयात येण्यापूर्वीच घरची मंडळी जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी त्यांची लग्ने उरकून टाकतात. अल्पवयीन मुलांची होत असलेली अशी लग्ने रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे पथक लक्ष ठेवून असते; असे सांगण्यात आले.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालविवाहरोखण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने २०२० पासून ते २०२२ पर्यंत जवळपास १०४ बालविवाह रोखले आहेत. एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असल्यास लगेच त्या ठिकाणी पोलिसांसह धाड घेतली जाते. दोन्ही बाजूंच्या पालक मंडळींची समजूत घातली जाते. नाइलाजास्तव कार्यर्वाही होते. त्यामुळे अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे; असे पथकातील वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

– – – 

लाखाचा दंड अन् दोन वर्षे कारावास…

बालवयात होत असलेल्या लग्नाला उपस्थित राहत असलेल्या वऱ्हाडी मंडळींना लाख रूपयांचा दंड आणि दोन वर्षाचा कारावास होऊ शकतो. खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

– – – 

काय आहे कायदा ?
मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न लावता येत नाही. सज्ञान होण्यासाठी वयाची ही मर्यादा पूर्ण करणे आवश्यक असते. प्रतिबंधात्मक अधिनियम २००६ नूसार संबंधित वरवधूसह नातेवाईकांना शिक्षा होऊ शकते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!