जिंती येथे श्रीमंत शहाजीराव राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त "श्रीमंत मकाई चषक 2022" चे आयोजन.. - Saptahik Sandesh

जिंती येथे श्रीमंत शहाजीराव राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त “श्रीमंत मकाई चषक 2022” चे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जिंती (ता.करमाळा) येथील श्रीमंत शहाजीराव उमाजीराव राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजेभोसले फाऊंडेशन आयोजित श्रीमंत मकाई चषक 2022 भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ श्रीमंत शिवाजी राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी श्रीमंत मकाई समाधीला पुष्प अभिवादन करून अभिवादन केले तसेच यावेळी हालगीच्या जंगी स्वागतात ग्रामस्थांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. जिंती येथे श्रीमंत शहाजीराव उमाजीराव राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजेभोसले फाऊंडेशन आयोजित श्रीमंत मकाई चषकचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी जिंती गावातील जेष्ठ नागरिक मकाई क्रिकेट क्लबचे जुने नवे सहकारी राजेभोसले परिवाराचे तरूण सहकारी मित्र ग्रामस्थ एक कुटुंब म्हणून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!