दत्तकला शिक्षण संस्थेत बालदिन उत्साहात साजरा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दत्तकला इंटरनॅशनल स्कूल व दत्तकला सी.बी.एस.ई. स्कूल येथे भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ उपस्थित होत्या. नेहरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रताप कडू यांनी नेहरू जींचे मुला लहान मुलांबद्दल असलेले विचार मुलांना सांगितले.
एस. एस. सी विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाषणामधून आराम हराम है हे त्यांचे विचार सांगितले: सी.बी.एस ई विभागामध्ये बालदिनाचे औचित्य साधून स्टुडंट लिड कॉन्फरन्स हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अभ्यासक्रमातील काही विषय विद्यार्थ्यांनी सौ.सचिव झोळ मॅडम यांच्या समोर सादर केले.याप्रसंगी बोलत असताना सौ.झोळ मॅडम यांनी विद्यार्थ्याना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यानी करत असलेल्या उपक्रमाबाबत त्याचे कौतुक केले व दत्तकला शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असते असे ही म्हणाल्या.
या कार्यक्रमाला दोन्ही विभागाच्या प्राचार्या नंदा ताटे व सिंधू यादव तसेच विभागप्रमुख धर्मेंद्र धेंडे सौ. संगिता खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. निलेश पवार यांनी केले.