श्री देवीचामाळ येथील विविध विकास कामांचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते उद्या 9 जानेवारीला उद्घाटन.. - Saptahik Sandesh

श्री देवीचामाळ येथील विविध विकास कामांचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते उद्या 9 जानेवारीला उद्घाटन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री देवीचामाळ येथील विविध विकास कामांचे उद्घाटन उद्या (ता.९) करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती सरपंच महेश सोरटे यांनी दिली.

तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून कमला भवानी मंदिर विकासासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून त्यामध्ये श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट व पेविंग ब्लॉक बसविणे – 99.81 लक्ष, श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिराकडे जाणारी रस्ते डांबरीकरण करणे- 67.64 लक्ष, संरक्षक भिंत बांधणे 148.76 लक्ष, स्ट्रीट लाईट बसविणे 15 लक्ष, स्नानगृह व मुतारी बांधणे 21 लक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे 6 लक्ष असे एकूण 4 कोटी निधी असलेले विकास कामे तसेच पंधरावा वित्त आयोग, ग्राम विकास विभागाकडून 25 15 अंतर्गत झालेली कामे, लोक वर्गणी, जन सुविधा योजना, आमदार निधी या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा सोमवारी संपन्न होणार आहे.

एकूण 4 कोटी 42 लाख रुपये निधीतून उभारलेल्या विविध कामांचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी अध्यक्ष म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत देवीचा माळ यांच्याकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!