तहसील कार्यालयाकडून करमाळा शहरात काढण्यात आली 'मतदान जनजागृती पदयात्रा' - Saptahik Sandesh

तहसील कार्यालयाकडून करमाळा शहरात काढण्यात आली ‘मतदान जनजागृती पदयात्रा’


करमाळा (दि.२५) –  येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून उमेदवारी भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवी, मतदान  जनजागृती करावी या उद्देशाने तहसील कार्यालयाकडून करमाळा शहरात  ‘मतदान जनजागृती पदयात्रा’ काढण्यात आली.

ही जनजागृती फेरी आठवडा बाजार करमाळा येथे काढण्यात आली.  निवडणूक अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित कदम अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग १ पं स करमाळा जयवंत नलवडे स्विप नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी पं स करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली करमाळा येथील आठवडी बाजारामध्ये विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले विस्तार अधिकारी नितीन कदम तसेच केंद्रप्रमुख संजय मुंडे केंद्रप्रमुख निशांत खारगे विषय तज्ञ हनुमंत ढेरे विषय तज्ञ दत्तात्रय जाधव शालेय पोषण आहार डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रवीण बांगर मुख्याध्यापक संतोष पोतदार या सर्वांनी मिळून बाजारामध्ये आलेल्या ग्राहकांना शंभर टक्के मतदान करणे बाबत उद्बोधन करण्यात आले.

यावेळी आठवडी बाजारातील ग्राहकांना तसेच दुकानदारांना मतदान करणे बाबत जनजागृती करण्यात आली विशेषता महिला मतदान टक्केवारी वाढण्यासाठी सर्व येणाऱ्या महिलांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी बाजारातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले की आपणही येणाऱ्या ग्राहकांना विधानसभेच्या मतदानादिवशी अवश्य मतदान करण्यात यावे असे विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले यांनी आवाहन केले यावेळी लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला तसेच सुपनवरवस्ती येथील श्री वाघमोडे सेवानिवृत्त शिक्षक हेळकर गुरुजी यांनीही जनजागृतीसाठी सहकार्य केले व आम्हीही जनजागृती करू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!