यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अग्नीवीरांचा सन्मान - Saptahik Sandesh

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अग्नीवीरांचा सन्मान

करमाळा(दि.१६): करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन.सी.सी विभागातील कॅडेट यांची अग्नीवीर व पोलीस भरती मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महाविद्यालयातवतीने करण्यात आला.

महाविद्यालयातील एन .सी .सी कॅडेटची अग्निवीर भरतीमध्ये समर्थ वीर, सिद्धेश्वर साळुंखे, सत्यवान राऊत, सुरज गिरवले, सोमनाथ ठोंबरे,विनोद निमगिरे तर पोलीस भरतीमध्ये कु.निकिता बनकर, कु. ज्योती मुसळे भरती झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री.विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड,संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी चि.समर्थ वीर याने आपल्या मनोगतातून महाविद्यालयात असलेल्या एनसीसी विभागाचे व महाविद्यातील असलेल्या सुविधांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे कु. ज्योती मुसळे हिने आपल्या मनोगतातून महाविद्यालयात असलेल्या भौतिक सुविधा व महाविद्यालयातील असणारा सर्व शिक्षकवृंद त्यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळते. त्याचा अवश्य लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या हातून देशाची,समाजाची, आई – वडीलाची व गोरगरिबांचे सेवा अगदी निष्ठापूर्वक करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांनी सांगितले की प्रशासकीय सेवा करत असताना आपली कर्तव्य जबाबदारी याचे काटेकोरपणे पालन करून आपल्या सेवेत यशस्वी व्हावे व भविष्यातील पुढच्या पदावर कार्य करण्याची संधी मिळावी असा मनोदय व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक एनसीसी विभागाच्या कॅप्टन डॉ.विजया गायकवाड यांनी केले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी एनसीसीचा इतिहास सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मुक्ता काटवटे यांनी केले तर आभार सीटीओ प्र.राम काळे यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!