प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनच्या पुढाकाराने वाशिंबे गाव,स्मशानभूमी व परिसर झाला प्रकाशमय.. - Saptahik Sandesh

प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनच्या पुढाकाराने वाशिंबे गाव,स्मशानभूमी व परिसर झाला प्रकाशमय..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वाशिंबे (ता.करमाळा) गाव व परिसरात बऱ्याच लोकवस्ती, स्मशानभूमी, मंदिरे,शाळा या ठिकाणी लाईटची (विजेची) सोय नव्हती व त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. त्यासाठी ग्रामस्थानी प्रा.रामदास झोळ यांच्याकडे मागणी केली व प्रा.झोळ सर यांनी प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन च्या माध्यमातून सर्व अडचणी दुर केल्या आहेत.

वाशिंबे गावातील आप्पा झोळ वस्ती, ज्योतिबा मंदिर, स्मशानभूमी, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, रेल्वे बोकदा, म्हसोबा मंदिर, सोगाव, टापरे चौक, चव्हाण वस्ती,सुतार गल्ली या वर्दळीच्या ठिकाणी लाईटची सोय नव्हती. त्याठिकाणी १०० W चे सोलार बल्ब पोलसहित बसवून देवून ती ग्रामस्थांची गैरसोय दूर करून देण्यात आली व त्याच प्रकारे भैरवनाथ मंदिर ,झोळ वस्ती, पवार वस्ती, शिंदे वस्ती, देवी मंदिर, गणेश झोळ वस्ती, गायकवाड वस्ती, गुरव वस्ती, ज्योतिबा मंदिर या ठिकाणी बसण्यासाठी ४० बाकड्यांची व्यवस्था प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन मार्फत करण्यात आली.

याबाबत प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी सांगितले की, वाशिंबे गाव व परिसर या ठिकाणी येथून मागे देखील ग्रामस्थांच्या मागणीनुसार विविध समाजपयोगी कामे या फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्यात आली आहे.त्यामध्ये,सोलर दिवे बसविणे,कॉर्नर मिरर बसविणे, वृध्दांना बसण्यासाठी बाकड्याची सोय करणे,वृक्षारोपण,रस्त्यासाठी आर्थिक मदत करणे, ई श्रम कार्ड काढण्याबाबत शिबिर आयोजन करणे,तुळजापूर व पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी बसची सोय करणे अश्या प्रकारची कामे या फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे व येथून पुढे देखील फाऊंडेशन च्या माध्यमातून वाशिंबे व परिसर या ठिकाणी मदत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!