सातोली ग्रामविकास आघाडीचे बहुमत - ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कदम तर उपसरपंचपदी खुपसे यांची बिनविरोध निवड - Saptahik Sandesh

सातोली ग्रामविकास आघाडीचे बहुमत – ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कदम तर उपसरपंचपदी खुपसे यांची बिनविरोध निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सातोली (ता.करमाळा) येथील झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सातोली ग्रामविकास आघाडीने बहुमत प्रस्थापित करून कै.शंकरराव साळुंके (बापू) यांच्या विचारांची सातोली ग्रामविकास आघाडी या पॅनलचे प्रमुख दिगंबरराव साळुंके यांच्या मार्गदर्शन व नियोजना खाली ही निवडणूक पार पडली असून ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनोहर कदम तर उपसरपंचपदी भास्कर खुपसे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पद हे अनुसूचित जाती साठी आरक्षित असल्याने व त्या ठिकाणी ग्रामविकास आघाडीचाच मनोहर कदम हा फक्त एकमेव उमेदवार निवडून आलेला असल्याने त्याची बिनविरोध निवड झाली. तर उपसरपंच पदासाठी ग्रामविकास आघाडी चे भास्कर खुपसे यांचा यांचा अर्ज आला होता त्यामध्ये खुपसे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वनिता पाडसे, पल्लवी फरतडे, रोहिणी साळुंके, वैशाली भोगे, विजय साळुंके उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमरजित साळुंके, अजिनाथ फरतडे, राहुल चव्हाण, प्रविण साळुंके,विठ्ठल फरतडे, सुहास फरतडे, संग्राम साळुंके, महादेव साळुंके, अशोक मुटेकर, राजाभाऊ साळुंके, नवनाथ फरताडे, रोहिदास चव्हाण, अनिल यादव, उमेश साळुंके, कल्याण फरतडे, ब्रह्मदेव साळुंके, महारुद्र मेटे, विकास पाडसे, गणपत चव्हाण, राम मस्के, बापू जाडकर, अण्णा गावडे, अरुण गाडे, मोहन गाडे आदींनी परिश्रम घेतले. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून के. के. खराव व सहकारी तलाठी उमेश बनसोडे, ग्रामसेवक तळेकर यांनी काम पाहिले तर पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Yash collection karmala clothes shop
Sonaraj metal and crockery karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!