दहिगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पाडुळे तर उपाध्यक्षपदी शेंडगे यांची निवड - Saptahik Sandesh

दहिगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पाडुळे तर उपाध्यक्षपदी शेंडगे यांची निवड

करमाळा(संदेश प्रतिनिधी) – शेळकेवस्ती दहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवस्ती दहिगाव शाळेच्या व्यवस्थापन समिती ची निवड आज करण्यात आली असून या शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी जोतिराम पाडुळे तर उपाध्यक्षपदी स्वाती महादेव शेंडगे यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये पालकसभा घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सदस्यांची निवड पालकामधून करण्यात आली यामध्ये जोतिराम पाडुळे यांची अध्यक्ष पदी तर स्वाती महादेव शेंडगे यांची उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीचे कामकाज मुख्याध्यापक श्री दस्तगीर शेख सहशिक्षक विजय राऊत यांनी यशस्वी रित्या पार पडले निवड झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार शिक्षक स्टाफ यांच्यावतीने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!