सालसे येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
करमाळा : सालसे(ता.करमाळा) येथे काल (दि.६) माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे शुभहस्ते अजित दादा तळेकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा कांबळे यांचे अध्यक्षतेखाली विविध विकासकामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.
यामध्ये सालसे- हिवरे रस्ता दुरुस्ती – २७ लाख, खंडोबा मंदिर सभामंडप ७ लाख ३२ हजार, जल जीवन मिशन या योजने अंतर्गत पाणी पूरवठा योजना – ९५ लाख, सीडी वर्क – ४ लाख, बिरोबा मंदिर सभामंडप- ६ लाख ५० हजार, दलित वस्ती गटार- ३ लाख व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती २ लाख ४० हजार अशी एकूण जवळपास १ कोटी ४५ लाख २२ हजार रुपयाची कामे सालसे येथे मंजूर झालेली आहेत.
या कार्यक्रमासाठी सालसे गावासोबतच विविध गावातील मान्यवर देखील उपस्थित होते. त्यामध्ये अतुल भाऊ पाटील, पं.स.सभापती, शेखर तात्या गाडे पं.स.मा. सभापती, दत्ता जाधव पं. स. सदस्य, घोटी गावाचे सरपंच सचिन राऊत, आवटी सरपंच दादा बंडगर, वरकुटे सरपंच दादा भांडवलकर, आळसुंदे सरपंच सोमनाथ देवकते, हिसरे सरपंच बाळू पवार, ग्रा.सदस्य साडे आण्णा आडेकर, चंद्रकांत अंबारे, विकास ननवरे, सामाजिक कार्यकर्ते आबा अंबारे, सालसे गावचे सरपंच सतीश ओहोळ सोबत सालसे गावचे युवा उद्योजक सुनील कदम, नितीन सपकाळ, संदीप रुपनर आदि लोक उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये गोकुळ पाटील, शेखर गाडे, आबा अंबारे, अनिरुध्द कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सतीश रुपनर यांनी तर आभार सुनील कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष वैभव घाडगे, ग्रामसेवक अनिल कब्जेकर, अभिनव भारत समाज सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत, पत्रकार विनायक सालगुडे, जालिंदर शिंदे, गणेश पाटील, विनोद सालगुडे, हनुमंत वायकुळे, निलेश सालगुडे, मलंग शेख आदी लोक उपस्थित होते.