‘इनडोअर’ व ‘आउटडोअर’ धनुर्विद्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचा दबदबा निर्माण करणारा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक – प्रा.रमेश शिरसट

केम/संजय जाधव
धनुर्विद्या हा खेळ एकाग्रता वाढवणारा खेळ असून सोलापूर जिल्ह्याचे पहिले प्रशिक्षक म्हणून इनडोअर व आउट डोअर या दोन्ही खेळाचे प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक रमेश शिरसट यांची ओळख आहे
माढा तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात धनुर्विद्या खेळाची सन 2003 ला सुरुवात झाली सोलापूर जिल्ह्यात या या खेळातून धनुर्धर तयार व्हावेत म्हणून प्राध्यापक रमेश शिरसट यांनी अमरावती येथील हनुमान व्यायाम शिक्षण प्रसारक मंडळ येथे महिनाभर प्रशिक्षण घेऊन अकलूज येथील द ग्रीन फिंगर्स स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धनुर्विद्या प्रशिक्षक म्हणून मुले घडवण्यास सुरुवात केली. द ग्रीन फिंगर्स स्कूल मधील अनेक विद्यार्थी शालेयपातळी व असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकले तर पाच धनुर्धरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड देखील झाली होती. सुरुवातीच्या काळात सोलापूर जिल्ह्यात अरण तालुका माढा येथे व अकलूजच्या द ग्रीन फिंगर्स स्कूल मध्ये धनुर्विद्या हा खेळ सुरू झाला. अरण तालुका माढा व अकलूजच्या द ग्रीन फिंगर्स स्कूलच्या धनुर्धरांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला दि ग्रीन फिंगर्स च्या अमर नागमोडे ,अमित शिंगटे, तन्वी शहा, सुमित एलपले ,आशिष पाटील, ओंकार साळुंखे ,सत्यजित मित्तर,धनश्री कानडे ,प्रज्ञा पोळ, सूर्यदेवसिंह पाटील, आकांक्षा शिरसट ,रत्नतेज शिरसट ,लखन भोई यासह विद्यापीठ पातळीवर ज्योती कदम ,मनोज पाटील, राजेश पाटील या शेकडो राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर धनुर्धर घडविण्यात प्राध्यापक रमेश शिरसट यांचे मार्गदर्शन वरील खेळाडूंना लाभले आहे तर सन 2014 मध्ये प्राध्यापक रमेश शिरसट यांनी सोलापूर डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशनच्या ‘इनडोअर फिल्ड आर्चरी असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केली त्यानंतर आउटडोअर बरोबरच इनडोअर फिल्ड आर्चरी चे प्रशिक्षण जिल्ह्यातील धनुर्धरास द्यावयास सुरुवात केली. 2014 पासून ते आजतागायत आठ वर्षात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, करमाळा, मोडनिंब, अरण, सोलापुर, कुर्डवाडी, टेंभुर्णी या भागातील धनुर्धरांना इनडोअर फिल्ड आर्चरीचे प्रशिक्षण दिल्यामुळे जवळपास सोलापूर जिल्ह्यातील अडीचशे खेळाडू राष्ट्रीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय पातळीवरती पदके मिळवली आहेत. प्राध्यापक रमेश शिरसट यांनी आउटडोर आर्चरी स्पर्धेत दिल्ली, मुंबई व इतर ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश, पंजाब या ठिकाणी पार पाडलेल्या राष्ट्रीय शालेय व असोसिएशनच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक मार्गदर्शक, व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे
आउटडोअर इनडोअर फिल्ड अर्चरी राज्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील पंच परीक्षेत यश मिळवले आहे.प्राध्यापक रमेश शिरसट यांनी फिल्ड आर्चरी लेवल वन चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे सोलापूर जिल्ह्यातील धनुर्धरांना, पालकांना धनुर्विद्याची सखोल माहिती व्हावी म्हणून राज्यातील पहिले धनुर्विद्या खेळाविषयीचे माहिती देणारे ‘सुवर्णवेध’ हे पुस्तक मराठीतून प्रकाशित केले आहे.
द ग्रीन फिंगर्स स्कूल सोडल्यानंतर पंढरपूर, इंदापूर व टेंभुर्णी येथील शैक्षणिक संस्थांमध्ये धनुर्विद्या या खेळाचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यानंतर टेंभुर्णी येथे चॅम्पियन्स आर्चरी अकॅडमी स्थापन करून मुलांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. टेंभुर्णीच्या अकॅडमी मधील गौरी ढवळे, आयुष जवळगे, तुषार घाडगे, रवी घाडगे, शिवम पवळे, गाथा खडके, सुहास शिंदे, निशांत क्षीरसागर हे धनुर्धर राष्ट्रीय फिल्ड इनडोअर आर्चरी संघात भारतात अव्वल आले आहेत.
गेल्या वर्षीपासून कुर्डूवाडी मधील विविध शाळेतील मुलांना धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण देणे सुरू असून कुर्डूवाडी अकॅडमीतील वरुण राज पाटील, गौरवी जगताप, शालवी काळे, तनिष्का ताटे हे धनुर्धर राज्यपातळीवर चमकदार कामगिरी केल्याने त्यांची राष्ट्रीय पातळीवरील इंडोअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्राध्यापक रमेश शिरसट यांनी राष्ट्रीय फिल्ड इनडोअर आर्चरी संघात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यश मिळवणाऱ्या धनुर्धरांचा दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवत आहेत तर धनुर्विद्या खेळ सोलापूर जिल्ह्यात वाढीस लागावा म्हणून रोख पारितोषकाच्या स्पर्धा त्याचबरोबर दरवर्षी निवड चाचणी स्पर्धा घेऊन विजेत्या धनुर्धरांना प्रमाणपत्र व पदके देऊन गौरव करण्याचा उपक्रम राबवत आहेत. नुकतेच मोडनिंब येथे यशस्वी राज्यस्तरीय इंडोअर आर्चरी स्पर्धेचे त्यांनी आयोजन केले होते.या स्पर्धेमध्ये राज्यातील जवळपास साडेतीनशे धनुर्धरांनी सहभाग घेतला होता.
प्राध्यापक रमेश शिरसट हे सोलापूर जिल्ह्यातील आऊटडोअर इंडोअर धनुर्विद्या या खेळाचे देणारे प्रशिक्षण देणारे एकमेव प्रशिक्षक असून गेली सतरा वर्षे सातत्याने ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या या योगदानामुळे महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून 2012 -13 चा जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त झाला आहे तर मुलगी आकांक्षा शिरसट हिस ‘उत्कृष्ट गुणवंत खेळाडू पुरस्कार’ मिळालेला आहे. मुलगा रत्नतेज शिरसट धनुर्विद्येचा राष्ट्रीय खेळाडू आहे.
प्राध्यापक रमेश शिरसट यांच्या 17 वर्षाच्या धनुर्विद्या योगदानात मा. हरिदास रणदिवे , मा. प्रमोद चांदुरकर, मा.सुभाष नायर मा. रणजित चामले यांचे सहकार्य लाभले आहे.