पोटेगाव येथील जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.१०) : पोटेगाव (ता.करमाळा) येथील देवीच्या मंदिराचे पाठीमागे आडोशाला काही व्यक्ती पत्यांचा डाव खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने, करमाळा पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना तातडीने जावून २३४०/- रुपये रोख रक्कम जप्त करून ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार काल (ता.९) घडला आहे.
यात करमाळा पोलिसांनी फिर्याद नोंदविली असून त्यात त्यांनी म्हटले कि, पोटेगाव (ता.करमाळा) येथील देवीच्या मंदिराचे पाठीमागे आडोशाला काही व्यक्ती पत्यांचा डाव खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानेआम्ही तातडीने दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन घेवून आम्ही दोन पंचांसह तेथे गेल्यानंतर आम्ही थोडे अलिकडे वाहन उभा करून सदर ठिकाणी पायी चालत गेलो असता तेथे काही व्यक्ती वर्तुळाकार बसुन पत्याचे डावावर जुगार खेळत असल्याचे दिसले. तातडीने त्याठिकाणी आम्ही त्यांना घेराव घालुन जागीच पकडले.
त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) संतोष दिगंबर हराळ वय 42 वर्षे रा पोटेगाव ता करमाळा २) सुनिल संभाजी गोसावी वय 55 वर्षे रा पोटेगाव ता करमाळा ३) जालिंदर गजेंद्र होगले वय 41 वर्षे रा पोटेगाव ता करमाळा ४) चंद्रकांत शंकर हाळणोर वय 40 वर्षे रा पोटेगाव ता करमाळा ५) गुरुलिंग दत्तु जगदाळे वय 66 वर्षे रा पोटेगाव ता करमाळा असे असल्याचे सांगीतले. पकडलेल्या व्यक्तीकडून २३४०/- रुपये जप्त वरील पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
