करमाळ्यात रहदारीस अढथळा करणाऱ्या रिक्षाचालकाविरूध्द कारवाई

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.25: करमाळा शहरातील रस्त्याच्या रहदारीस अढथळा करणाऱ्या रिक्षाचालकाविरूध्द पोलीसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार 23 सप्टेंबरला दुपारी 12-30 वाजता घडला आहे.

यात पोलीस काॅन्स्टेबल आनंद भागवत पवार यांनीे फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की 23 सप्टेंबरला दुपारी12-30 वाजता करमाळा शहरात पेट्रोलींग करत असताना एस. टी. स्टँड समोर आलो असता रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल अशा स्थितीत तीन चाकी रिक्षा (एम एच-16 डब्ल्यु- 9770) इरफान अब्दुल शेख (वय-20 रा. सुमंत नगर करमाळा ) हा लावून बसला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!