घोटी-वरकुटे रस्त्यावर दुधाच्या टँकरची लिंबाच्या झाडाला धडक – टँकरची पलटी – 51 वर्षाचा पुरुष जागीच ठार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील घोटी-वरकुटे रस्त्यावर एका दुधाच्या टँकरने लिंबाच्या झाडाला धडक देवुन टँकरची पलटी होवून 51 वर्षाचा पुरुष जागीच ठार झाला आहे, हा अपघात 21 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याची सुमारास घोटी-वरकुटे रस्त्यावर झाला आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धर्मा जाधव यांनी करमाळा पोलिसात फिर्यादी असून त्यात त्यांनी म्हटले की, वरकुटे ते घोटी जाणारे रोडवर रामचंद्र राउत यांचे शेताजवळ रोडचेकडेला 21 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याची सुमारास एक टॅंकर चालक सुनिल गेना शेलार (वय 51 वर्षे,रा.वेणेगाव ता.माढा जि.सोलापूर) हे त्यांचे ताब्यातील दुधाचा टॅंकर एम.एच.25 ए.जे.0665 हा घोटी ते वरकुटे गावाकडे जाणारे रोडने वरकुटेचे दिशेने जात असताना त्यांचे निष्काळजीपणामुळे, भरधाव वेगाने, रोडचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, रस्त्याचेकडेला लिंबाचे झाडास धडकुन टॅंकर पलटी होवून त्यामध्ये त्यांचे डोकीस व इतर ठिकठिकाणी शरिरावर गंभीर जखमा होवून ते उपचारापुर्वीच जागीच मयत झाले आहेत.

याप्रकरणी करमाळा पोलिसांनी मयत चालक सुनिल गेना शेलार याच्यावर भरधाव वेगाने गाडी चालवून स्वतः मरणास व गाडीचे इतर जवळपास 50 हजारांचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!