अर्जुन नलवडे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : चिखलठाण नं. १ येथील रहिवाशी व वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी अर्जुन नरहरी नलवडे (वय६३) यांचे दीर्घ आजाराने १७ सप्टेंबरला राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
नलवडे यांचा फेब्रुवारी २०२१ मध्ये पोफळज फाट्याजवळ मोटारसायकलला कारने धडक दिल्याने अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांचेवर पुणे व नगर असे उपचार करण्यात आले. मेंदूबाबत आवश्यक ती शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परिवाराने लाखो रूपये खर्च करून व जीवापाड सेवा केली. असे असलेतरी नलवडे यांचे राहत्या घरी निधन झाले.
नलवडे हे मनमिळावू व अनेकांचे ते मित्र होते. त्यांचे वक्तृत्व व सुत्रसंचलन वाखणण्यासारखे होते. अनेक लग्न समारंभात त्यांचे सुत्रसंचलन खास ऐकले जात होते. भाषणातही ते वाक्बार होते. त्यांच्या जाण्याने निश्चितच एक चांगल्या व्यक्तीला तालुका मुकला आहे.
