महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक साने सर यांचे निधन

0

करमाळा (दि.३) : महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक श्री. सालोमन मोझेस साने (वय ५९) यांचे आज, दि. ३ मे २०२५ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आदी परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५ वाजता करमाळा येथे पार पडला. साने सर हे मूळचे सोलापूर होते. नोकरी निमित्त ते करमाळा शहरात स्थायिक झाले होते. महात्मा गांधी विद्यालयातील तांत्रिक विभागात ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विद्यालयात ओळख होती. विद्यालयातून ते २०१३ साली निवृत्त झाले होते. सेवानिवृत्त नंतर देखील ते राहण्यास करमाळा येथेच होते.

त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी यांनी दुःख व्यक्त केले.  साने सरांच्या निधनाचे वृत्त समजताच संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देखील दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!