जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रसाद वने या विदयार्थाची निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव): सोलापूर जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात करमाळा येथे आयोजित केलेल्या बुद्धी बळ स्पर्धेत केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचा कुमार प्रसाद वने या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय सोलापूर येथे होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विदयार्थाला क्रिडा शिक्षक दादा अवताडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य रणदिवे, चेअरमन सुदर्शन तळेकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक रणदिवे सर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला