शेटफळ येथे जगदिशब्द फाऊंडेशनची शैक्षणिक साहित्याची मदत - Saptahik Sandesh

शेटफळ येथे जगदिशब्द फाऊंडेशनची शैक्षणिक साहित्याची मदत

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील सोमनाथ माने यांचे कोरोनामध्ये निधन झाले, त्यामुळे यांच्या मुलांना मदत म्हणुन जगदिशब्द फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली.

Yash collection karmala clothes shop

मागील वर्षी मे महिन्यात शेटफळ (ता करमाळा) येथील खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे सोमनाथ माने या अठ्ठावीस वर्षीय तरूणाचे दु:खद निधन झाले, त्यांना तीन लहान मुले आहेत ही बातमी जगदिशब्द फाऊंडेशनचे अध्यक्ष व करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक कार्यकर्ते जगदिश ओहोळ यांना पुणे येथे समजल्यावर त्यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व त्यांच्या तीन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले गेल्या वर्षी त्यांनी सर्व शालेय साहित्याची मदत केली होती, यावर्षीही माने कुटुंबियांना भेट देऊन मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे.

S.K. collection bhigwan

अशा प्रकारची मदत सोगाव येथील कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या बालकांनाही केली असून या मुलांचे शिक्षण थांबू नये, ती बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत, या हेतूने जगदीशब्द फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे, शेटफळ व सोगाव येथे साहित्य वितरित करताना सरपंच स्वप्नील गोडगे,या फाऊंडेशनचे निलेश पाखरे,साहित्यिक गंगासेन वाघमारे ग्रामपंचायत सदस्य बापु सलपुरे, विलास सव्वालाख, दया सरडे, दत्ता सावंत, दादा गोडगे, राजेंद्र नगरे, दादा सरडे व नागरिक उपस्थित होते. तर शेटफळ येथे सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र पोळ प्रशांत नाईकनवरे व नागनाथ माने उपस्थित होते.

Sonaraj metal and crockery karmala

जगदीश भाऊ आमच्या लेकरांसाठी शाळेचं साहित्य घेऊन आठवणीने आले , आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर त्यांचं लक्ष आहे, या गोष्टीचा आधार वाटतो. – रूक्मिणी माने (सोमनाथ माने यांच्या आई शेटफळ )

कोरोनामुळे आईवडील गमावलेली छोटी बालके घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाचा मुळ प्रवाहापासून दूर जाऊ नयेत व या कुटुंबाच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असुन यामधुन आम्हाला मानसिक समाधानाचा अनुभव मिळतो.

– जगदिश ओहोळ (संस्थापक, अध्यक्ष जगदिशब्द फाऊंडेशन)

Sonali ply and furniture shop karmala
फोटो ओळी : शेटफळ ता करमाळा येथील कोरोनामुळे वडील गमावलेल्या माने परिवारातील मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देताना जगदिश ओहोळ,गंगासेन वाघमारे निलेश पाखरे व‌ प्रशांत नाईकनवरे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!