चिखलठाणच्या सुराणा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
करमाळा, (दि.४) : चिखलठाण (ता.करमाळा) येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सन 2021-22 मध्ये झालेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विद्यालयातील एकूण 22 विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते त्यापैकी 15 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण १५ विद्यार्थ्यांपैकी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत 1 व सारथी शिष्य वृत्ती मध्ये 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
यामध्ये तुषार हनुमंत पवार हा एन.एम एम.एस शिष्यवृत्तीधारक आहे. तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी नम्रता नागनाथ जगताप, सार्थक अशोक राखुंडे,श्रेया जोतीराम पवार, यश किरण सरडे, ऋषिकेश संतोष कामटे, गिरीश सचिन क्षीरसागर, वैष्णवी विकास गव्हाणे हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
एन.एन.एम.एस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना चार वर्षाला प्रत्येकी 12 हजार रुपये प्रमाणे 48000 रुपये मिळतात.तर सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना चार वर्षाला प्रत्येकी 9 हजार 600 रुपये प्रमाणे 38 हजार 400 रुपये मिळतात.या प्रमाणे विद्यालयातील 8 विद्यार्थ्यांना एकूण 316800 तीन लाख सोळा हजार आठशे एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक व विभाग प्रमुख बिभीषण भोई यांचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, मध्य विभागाचे चेअरमन संजीव जयकुमार पाटील, मध्य विभागाचे इन्स्पेक्टर राजेंद्र साळुंखे, स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती,प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुराज माने व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने,गुरुकुल विभाग प्रमुख साईनाथ लोहार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक शिवाजी मासाळ यांनी केले .यशस्वी विद्यार्थ्यांचे चिखलठाण व पंचक्रोशी मध्ये सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.