चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सन्मान सोहळा संपन्न - Saptahik Sandesh

चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सन्मान सोहळा संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माढा तालुका आमदार बबन दादा शिंदे व त्यांच्या पत्नी सुनंदा शिंदे वहिनी व शिवसेना सोलापूर जिल्हा उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते संपन्न झाला.

चिखलठाण गावचे सलग 35 वर्ष सरपंच पद भूषविलेले कै. वस्ताद सुखदेव गलांडे यांच्या पुतळयाला आमदार बबनदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमा चे अध्यक्षस्थान करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे साहेब यांनी भूषविले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड साहेब यांनी केले.

Yash collection karmala clothes shop

यावेळी इंटरनॅशनल टॅलेंट परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल रणजित नवनाथ मारकड चिखलठाण यांचा सन्मान माढा तालुका आमदार बबन दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, एकरी 100 टन ऊस उत्पादन केल्याबद्दल प्रगतशील बागायतदार चंद्रकांत सुरवसे, ऊस वहातूकदार साहेबराव मारकड, कोरोना काळात चांगले काम केल्या बद्दल डाॅ. बारकुंड यांचा सन्मान दादासाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

S.K. collection bhigwan

यावेळी चिखलठाण विकास सेवा सोसायटी चे चेअरमन विकास गलांडे, कुगाव सरपंच महादेव कामटे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदिपान तात्या बारकुंड, दैनिक लोकमत पत्रकार नासिर कबिर, चिखलठाण माजी उपसरपंच दिनकर नाना सरडे, महेश कानगुडे, समाधान गव्हाणे, बाबू गोळे, सोमनाथ राऊत, अतुल जानभरे, चिखलठाण ग्रामस्थ, युवा वर्ग उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे आयोजन जानता राजा गणेश मंडळ चिखलठाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषद राजेंद्र बारकुंड साहेब व डाॅ. भूषण बारकुंड मित्र मंडळ चिखलठाण व समस्त ग्रामस्थ चिखलठाण यांनी केले .

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!