सावंत परिवारातील १४ वर्षाच्या साक्षीचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : सावंत परिवारातील सचिन सावंत यांची कन्या साक्षी सचिन सावंत (वय-१४) हिचे आज (ता.७) ह्रदयविकाराने निधन झाले आहे. साक्षी ही इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होती. साक्षी ही विठ्ठलआप्पा सावंत यांची नात तर सावंत गटाचे नेते सुनील सावंत व नगरसेवक संजय सावंत यांची पुतणी होती. आज सायंकाळी करमाळा शहराजवळील जामखेड रोड बायपास चौकातील सावंत फार्म हाऊसवर साक्षीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. अगदी कमी वयात निधन झाल्याने करमाळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

S.K. collection bhigwan
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!