मकाई देणार एका टनाला २५०१/- रूपये – दिग्विजय बागल यांची घोषणा
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याने ऊसाचा दर जाहीर केला असून, यावर्षीच्या हंगामात प्रतिटनाला २५०१ रू. दर दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या वाहतूकदाराची बैठक संपन्न झाली. यावेळी मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, संचालक बाळासाहेब पांढरे, शेतकी अधिकारी शिवाजी कदम उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. बागल यांनी कारखान्याच्या दराची घोषणा केली असून, यावर्षी ऊसाला अंतिम दर प्रतिटन २५०१ रू. असून पहिला हप्ता २३०१ रू., दुसरा हप्ता १०० रू., व तिसरा हप्ता १००रू. असा २५०१ रू. दर दिला जाणार आहे.
कारखान्याच्या सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा. तसेच वाहतूकदार व कामगारांनी योग्य ते सहकार्य करावे; असेही आवाहन श्री. बागल यांनी केले आहे.