उद्या (गुरूवारी) वीट येथे ऊस वाहतूक रोको आंदोलन होणार - स्वाभिमानीचा इशारा - Saptahik Sandesh

उद्या (गुरूवारी) वीट येथे ऊस वाहतूक रोको आंदोलन होणार – स्वाभिमानीचा इशारा

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.2
: वीट (ता. करमाळा) येथे उद्या (ता.3 गुरूवारी) ऊस वाहतूक रोको आंदोलन होणार असून जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी केले आहे. याबाबत तहसीलदार समीर माने यांना त्यांनी लेखी निवेदन दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा ऊस दर पहीली उचल २५००/रू व अंतिम दर हा ३१००/ रू जाहीर करून कारखाने सुरू करावे असे ऊस दर संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीने सांगण्यात आले होते परंतु हे कारखानदार शेतकऱ्यांच्या मागणीची चेष्टा करत आहेत ही मागणी धुडकावून लावली आहे.तरी या मागणीसाठी आता स्वतः शेतकरी उतरताना दिसत आहे.व काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही आले आहे.

तरी या मागणीसाठी गुरूवारी ३/११/२०२२ रोजी दुपारी २ वाजले पासून जोपर्यंत करमाळा तालुक्यातील ऊस कारखान्याचे चेअरमन दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत विट येथे ऊस दर संघर्ष समिती करमाळा तालुका यांच्या वतीने इतरांना त्रास न देता ऊस वाहतूक रोखण्यासाठी आंदोलन करण्यात येईल . त्याबाबत होणारे परीणामास प्रशासन जबाबदार राहील.असे म्हटले आहे.

हे निवेदन देते वेळस्वा.शे.संघटना.जिल्हाकार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे,रयत क्रांती राज्य सदस्य अजय बागल,बळीराजा जिल्हा अध्यक्ष आंण्णा सुपनवर,स्वा शे संघटना ता अध्यक्ष सुदर्शन शेळके,रयत क्रांती ता अध्यक्ष शिवशंकर जगदाळे,ता युवा अध्यक्ष अमोल घुमरे,बळीराजा ता उपाध्यक्ष अनिल तेली,पुरूषत्तम नरसाळे आदी शेतकरी उपस्थित होते तरी सर्व करमाळा तालुक्यातील शेतकरी व सर्व शेतकऱ्यांच्यासाठी काम करणाऱ्या संघटना व शेतकरी यांचे हित पहाणारे पक्ष यांनी मोठ्या संख्येने गुरूवार उद्या रोजी दुपारी २.०० वाजता विट येथे उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!