वीट येथील भैरवनाथ मंदिराच्या सुधारणेसाठी सव्वातीन लाख रू. वर्गणी जमा - Saptahik Sandesh

वीट येथील भैरवनाथ मंदिराच्या सुधारणेसाठी सव्वातीन लाख रू. वर्गणी जमा

वीट (तेजेश ढेरे यांजकडून) : पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी । देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ॥ एक वीतिच्या वितेस पुरते तळहाताची थाळी । हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी ।चोचीपुरता देव दाना माय माऊली काळी ॥देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ॥…

ग.दी.माडगुळकरांचे हे गीत प्रपंच चित्रपटात सुधीर फडके यांनी गायिलेले आहे. याची प्रचिती वीट येथे आली आहे. वीट येथील भैरवनाथ मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी आम्ही आवाहन केले आणि बघताबघता ग्रामस्थांनी काही तासातच सव्वातीन लाख रूपयाची देणगी दिली आहे. यातून या मंदिरात पेव्हर ब्लॉक बसविले आहे. तसेच सभामंडपामध्ये ग्रील बसवले आहे, कलरींग, कट्टा बांधलेला आहे आवश्यक त्या ठिकाणी कलर दिला आहे. २ हजार लिटर पाण्याची टाकी, पाईप लाईन व फिटींग मटेरियल, एलईडी दिवे, मंदिर परिसरात काळी माती टाकून तेथे वृक्षारोपणही केले आहे.

याकरीता संतोष हंबीरराव काळे व चंद्रकांत बरडे सर यांचेकडून १११११ रू., गौतम जगदाळे साहेब, रेवणनाथ भिसले साहेब = ११००० रू.

डॉ. संतोष म्हेत्रे, नंदकुमार कल्याणराव भोसले, प्रविण प्रदीप जाधव यांनी प्रत्येकी १० हजार रू., भारत बबन पठाडे, तेजश रघुनाथ ढेरे, रेवणनाथ बळीराम ढेरे, उत्तम दशरथ जगदाळे, इन्नुस ईस्माईल शेख, ज्ञानेश्वर बंडोपंत बावणे यांनी प्रत्येकी ५५५५ रू.,

आजिनाथ रामचंद्र राऊत-५०११ रु, अजित कल्याण निंबाळकर, भाऊसाहेब मुरलीधर म्हेत्रे, आशिष भारत शिंदे, डॉ. जगदीश संभाजी निंबाळकर, भजनदास प्रल्हाद खैरे, डॉ. तात्यासाहेब रामा जाधव, शशिकांत संपत निंबाळकर, नानासाहेब ज्ञानदेव जाधव, संजय रंगनाथ कुलकर्णी, आनंद दिलीपराव निंबाळकर, गणेश नारायण गाडे, गौतम हरिश्चंद्र ढेरे, अर्जुन पांडूरंग ढेरे, पाडूरंग अनंता चोपडे, जालिंदर शिवाजी निंबाळकर, अरूण कांतीलाल जाधव, अतुल आत्माराम राऊत, राजेंद्र आत्मराम गाडे, दिपक जनार्धन वाघमारे, बबन मारुती जाधव या सर्वांनी ५००१ रू.,

तसेच हरी कृष्णा ३७०० रू., अभय तुकाराम राऊत, प्रदिप रेवणनाथ जाधव, गणेश भागवत जाधव यांनी प्रत्येकी ३००१ रू., चांगदेव माणिकराव जाधव – २५५१ रु, दिलीप दत्तात्रय ढेरे, बाळासाहेब दगडू मारकड, शांतीलाल राघू जाधव व बाबू गोकुळ ढेरे यांनी प्रत्येकी २५०० रू. दिलेले आहेत. प्रकाश गोंदकर, गोविंद भोसले, गजेंद्र जाधव, भास्कर भिसले, संतोष शिंदे मेजर प्रत्येकी २१२१ रू., रेवणनाथ भोंग २०११ रू.

शिवाजी चोपडे, केतन आवटे, हनुमंत जाधव मेजर, औदुंबर बरडे, गणेश ढेरे, संतोष जगदाळे, भाऊसाहेब जगदाळे प्रत्येकी २१०० रू., विठ्ठल निकत, दादासाहेब गाडे, संजय खैरे प्रत्येकी २००१ रू., लालासाहेब गाडे १७०० रू, गणेश जाधव १५५५ रू., सुभाष भिसले १५५१ रु, विराज भोसले १५०० रू., नागनाथ जाधव १२०० रू., मनोज ढेरे, राहूल गिरीगोसावी, नितीन जाधव, लक्ष्मण ढेरे, विघ्नेश गणगे, किरण गाडे, अमेय गणगे, संतोष शिंदे, भागवत ढेरे ११११ रू., विलास जाधव जय श्रीराम, तात्यासाहेब आवटे ११०० रू,

राजेश जाधव, दयानंद ससाणे, गोरख जाधव, ज्ञानेश्वर ढेरे, स्व. सर्जेराव रामा काळे, मच्छिंद्र लक्ष्मण ढेरे, बबन नामदेव जाधव, चंद्रकांत जगदाळे, हरिभाऊ अनारसे, मधुकर शिंदे, दत्तात्रय जगदाळे, मनोज जाधव मेजर, नाना नाजरेकर जेजुरी, विलास वागदरे, विकास गाडे, गोरख ढेरे, युवराज जाधव, रेवणनाथ जाधव प्रत्येकी १००१ रू., नंदकुमार जाधव ९९९ रू, संतोष जाधव ६०० रू., योगेश चांदणे, सुभाष जाधव, भारत माधव जाधव प्रत्येकी ५५५ रू., राहूल जाधव, बप्पा आवटे, सतीश प्रभाकर कुर्डे, मिनीनाथ चोपडे, तानाजी राऊत, रेवणनाथ जाधव, वामन काळे, रेवणनाथ जाधव ५०१ रू.,

अशी एकूण ३,१५,५२१ रू. काही तासातच वर्गणी जमा झाली. त्यानूसार २६ ब्रास पेव्हरब्लॉक बसवले. जुनी फरशी व्यवस्थित बाहेर काढली. नवीन कट्टा तयार केला. मंदिर सभामंडपात ग्रील बसविले. एक कट्टा बनवला. अपॅक्स कलर नंदी बनवला, तसेच मंदिर परिसरात झाडे लावण्याचे काम झाले आहे. तेथे ट्रॅक्टरने माती आणून टाकली आहे. मंदिराचे गुरव राजाभाऊ आगलावे यांनी या कामी मोठी मदत केली आहे.

याशिवाय ज्ञानेश्वर प्रल्हाद गणगे यांनी मंदिराच्या आतील ग्रेनाईट, पीओपी व लाईटसाठी ७२ हजार रू. खर्च केले. राजेंद्र आदिनाथ शिंदे यांनी ५१ हजार रू. ची भैरवनाथ व जोगेश्वरची मुर्ती आणली. सरपंच उदय ढेरे यांनी दोन ट्रेलर वाळू दिली. एन. पी. इन्फ्रा कंपनी यांनी ६ ब्रास कच दिली.

अशाप्रकारे अनेकांनी मदत केलीच त्याशिवाय नानासाहेब जाधव यांनी काळी माती दिली. सोमनाथ जाधव, दिपक आवटे, शिवाजी काळे, मुकेश ढेरे, आनंद ढेरे, विकास जाधव, संतोष जाधव, सतीश पठाडे यांनी स्वत:ची कामे सोडून एक-एक ट्रेलर घेऊन माती आणून दिलेली आहे. तसेच गावातील खंडू आंबादास जाधव यांनी प्लंबिगचे काम मोफत करून दिले, याचबरोबर चांदणे पेंटरबंधूंनी कलर कामासाठी मोठे योगदान दिले आहे.

अशाप्रकारे व्यक्तीगत मदत होत असतानाच वीट विकास फाऊंडेशनच्या वतीने याकामी मदत केलेली आहे. नागरीकांच्या मनात आलं की कसं सुंदर जमतं याचं उदाहरण म्हणजे वीट येथील भैरवनाथ मंदिर व परिसराचा जीर्णोध्दाराचे काम होय. या सर्व दात्यांचं संयोजक तेजेश ढेरे यांनी मनापासून आभार मानले आहे.

For improvement of Bhairavanath temple at Veet, Rs. Subscription deposit

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!