कंदर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा..

कंदर प्रतिनिधी/संदीप कांबळे..
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील श्री.शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या नटखट लिला व सवंगड्या सोबत लोणी चोरून खाण्याच्या लिला दर्शवणारा गोकुळकाला म्हणजेच दहीहंडी… दह्यात साखर, साखरेत भात, उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांची साथ, फोडू हंडी लावून थरावर थर, जोशात साजरा करू आज गोपाळकाल्याचा सण, अशा या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण भारतात खुप मोठ्याप्रमाणात व आनंदात साजरा केला जातो.
या कलियुगात एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या या सणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगुन मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे आणि इतर शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..



