करमाळा येथील राशिन पेठ तरुण मंडळाची दहीहंडी सिद्धार्थ ग्रुपने फोडली…

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -करमाळा शहरातील यंदाच्या दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षण असलेली राशिन पेठ तरुण सेवा मंडळाची दहीहंडी शहरातीलच सिद्धार्थ ग्रुपने पाच थर लावत फोडली आणि प्रथम क्रमाचे क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

ही दहीहंडी फोडण्यासाठी स्वराज प्रतिष्ठान, देवीचा माळ, फंड गल्ली, गोबल सायन्स इन्स्टिटय़ूट या गोविंदा पथकांनी चार थर लावून सलामी दिली. मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दहीहंडी उत्सवात यावर्षी राशिन पेठ तरुण सेवा मंडळाने आमंत्रित केलेल्या बारामती येथील The Throne Dance Studio ने विविध गाण्यांवर धडाकेबाज डान्स करत दर्शकांना खिळवून ठेवले. तसेच माही डेकोरेशन यांनी दहीहंडीला श्री बालाजी देवतेच्या तिलकाच्या स्वरूपात केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
राशिन पेठ सह शहरातील नागरिकांनी या दहीहंडी उत्सवाचा पुरेपूर आनंद लुटला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राशिन पेठ तरुण सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






