वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम- शाळेला भेट दिले दहा हजाराचे साऊंड बाॅक्स - Saptahik Sandesh

वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम- शाळेला भेट दिले दहा हजाराचे साऊंड बाॅक्स

केम (प्रतिनिधी – संजय जाधव ) : युवासेनेचे जिल्हा समन्वयक व केम व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयात दहा हजार रूपये किंमतीचे दोन साऊंड बाॅक्स भेट दिले. याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष महेश तळेकर, मुख्याध्यापक मनोज तळेकर, मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, सुयश क्लासेस संचालक वसंत तळेकर,पै.महावीर तळेकर,पेंटर नितीन तळेकर, उपस्थित होते. तसेच त्यांचा शिवसेना शाखा केम यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!