करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी केम येथील अभिजीत तळेकर - Saptahik Sandesh

करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी केम येथील अभिजीत तळेकर

केम प्रतिनिधी / संजय जाधव :

करमाळा : करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपदी केम येथील अभिजीत तळेकर व केम शहराध्यक्षपदी सागर कुरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या नियुक्तीचे पत्र करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष वारे यांनी दिले.

या नियुक्तीबद्दल अभिजीत तळेकर व सागर कुरडे म्हणाले की, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून आम्ही दोघे सोडवण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

या निवडीबद्दल केम शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय मोहोळ सचिन काळे जामीर पठाण कृष्णा राऊत युवराज तळेकर गोरख नाईक नवरे सुरज गुरव सुलतान मुलानी समाधान नागणे, किरण तळेकर निखील तळेकर यांनी अभिनंदन केले आहे त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे या निवडिचे केम परिसरात स्वागत केले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!