आदिनाथ कारखान्यासाठी ६२ उमेदवार रिंगणात – तिरंगी लढत रंगणार

करमाळा(दि.३) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा काल(दि.२) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज मागे घेतले. शेवटच्या दिवशी ६२ उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत, त्यामुळे आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बागल गट व जगताप गटाने या आधीच या निवडणुकीतुन माघार घेतली असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घेतले. माजी आमदार संजयमामा शिंदे, विद्यमान आमदार नारायण आबा पाटील व प्रा. रामदास झोळ या तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी स्वतः या निवडणुकीत उतरत कार्यकर्त्यांना सोबत घेत पॅनल तयार केला आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून रंगत येणार आहे.


पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी पाटील गटाच्या वतीने पॅनल बद्दल माहिती देताना सांगितले की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जेष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव जगताप, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार नारायण आबा पाटील, सावंत बंधू यांच्या एकत्रीत विचारातुन या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने
२१ उमेदवार निवडलेले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत.
- जेऊर गटातुन १) श्रीमंत त्रिंबक चौधरी (उमरड), २) महादेव श्रीपती पोरे (कुगाव) ३) दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे (पोपळज) तर सालसे गटातुन १) रविकिरण पोपट फुके (करंजे) २) दशरथ येदू हजारे (जवळा) ३) आबासाहेब उर्फ वसंत शंकर अंबारे (गौंडरे).
- पोमलवाडी गटातून १) किरण जगन्नाथ कवडे(कात्रज) २) नवनाथ मधूकर झोळ (वाशिंबे) ३) संतोष खाशेराव खाटमोडे पाटील
- केम गटातुन १) दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख (वांगी १) २) विजयसिंह जिजाबा नवले (कंदर) ३) महेंद्र दिनकर फाटील (बिटरगाव )
- रावगाव गटातुन १) देवानंद गोपाळ बागल (मांगी) २) ऍडव्होकेट राहुल सुभाष सावंत (करमाळा) ३) डाॅ अमोल नानासाहेब घाडगे (तरटगाव)
- सोसायटी मतदार संघातुन डाॅ हरिदास तुळशीराम केवारे (आळजापुर)
- एस सी राखीव प्रवर्गातून राजेंद्र उर्फ राजाभाऊ भीमा कदम (उमरड)
- महिला राखीव मतदार संघातून राधिका भीमराव तळेकर (वांगी ) व उर्मीला हनूमंंत सरडे (चिकलठाण)
- इतर मागासवर्ग मतदार संघातून – दादासाहेब नामदेव पाटील (बिटरगाव )
- एन टी राखीव मतदार संघातून आमदार नारायण आबा पाटील


माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनल या निवडणुकीत उतरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार
यांच्या मान्यतेनुसार महायुती आदिनाथ बचाव पॅनल ची निर्मिती झाली असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले. या पॅनेलचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
- जेऊर गट – चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील ,प्रमोद बदे.
- सालसे गट – विलास जगदाळे,नवनाथ जगदाळे ,नागनाथ चिवटे
- पोमलवाडी गट – दशरथ पाटील ,नितीनराजे भोसले ,बबन जाधव
- केम गट – संजयमामा शिंदे ,सोमनाथ देशमुख,सोमनाथ रोकडे
- रायगाव गट – अभिजीत पाटील ,आशिष गायकवाड ,विनय ननवरे
- सहकारी संस्था – सुजित बागल.
- अनुसूचित जाती जमाती – बाळकृष्ण सोनवणे
- महिला राखीव – मंदाताई सरडे, शालन गुंडगिरे
- इतर मागासवर्गीय – रोहिदास माळी
- भटक्या जाती-जमाती – अनिल केकान


दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विधानसभा उमेदवार प्रा. रामदास झोळ यांनी देखील स्वतः या निवडणुकीत उतरत २० उमेदवारांचा श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनेल उभा केला आहे. त्यांचे उमेदवार पुढील प्रमाणे –
- रावगांव गटातून – कल्याण सिताराम पाटील, सुभाष बापुराव शिंदे, हरीभाऊ मच्छिंद्र झिंजाडे
- जेऊर गटातून – रविंद्र गोडगे, शांतीलाल जाधव आणि दत्तात्रय कामटे,
- सालसे गटातून – देवकर आण्णासाहेब भागवत, जगदाळे दत्तात्रय श्रीरंग आणि सरडे भरत गुलाबराव,
- केम गटातून साळुंके सुधीर हरीदास आणि तळेकर बापुराव ज्ञानदेव
- पोमलवाडी गटातून रामदास झोळ, भरत जगताप आणि प्रकाश गिरंजे
- भटक्या जाती व जमाती प्रवर्गातून रायचंद खाडे,
- अनुसुचित जाती प्रवर्गातून – दशरथ कांबळे
- इतर मागास प्रवर्गातील – रविंद्र गोडगे
- महिला राखीव – इंदुबाई नाईकनवरे आणि मंगवडे रत्नमाला मंगवडे
- संस्था पणन प्रतिनिधी – दशरथ कांबळे


