‘परोपकारी वृत्तीने वागल्यास परमेश्वर भरभरून देतो’ – माजी आमदार जयवंतराव जगताप

केम(संजय जाधव) : जीवनामध्ये सुखदुःख सर्वांनाच येत असतात. परंतु परमेश्वरांनी दिलेल्या परिस्थितीमध्ये भगवंताचे नामस्मरण करत आनंदाने राहणे हे महत्त्वाचे असते. परोपकारी वृत्तीने वागल्यास परमेश्वर भरभरून देत असतो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जनार्दन तर्कसे. असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
श्री जनार्दन विठ्ठल तर्कसे यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमानिमित्त ‘मायबाप दैवत आपले’ या विषयावर कवी इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक श्री श्रीराम तर्कसे यांनी केले.
कार्यक्रमाला दिलीप दादा तळेकर,जयंत गिरी महाराज पृथ्वीराज भैय्या पाटील, शैलेश दादा देशपांडे मिरज, अजित तळेकर, सरपंच राहुल आबा कोरे,पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे ,आनंद शिंदे,दिलीप दोंड,विलास बिचितकर,दयानंद तळेकर ,श्रीहरी तळेकर, सागर राजे दौंड,सागर राजे तळेकर,दत्तात्रय बिचितकर, बाळासाहेब देवकर, विष्णू दादा पारखे,गोसेवक परमेश्वर तळेकर, महावीर आबा,अच्युत काका, संदीप तळेकर,गणेश आबा तळेकर,बाजार समितीचे सहसचिव रवींद्र उकिरडे व दिगंबर रासकर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये विराज तळेकर याने कविता वाचन करून श्रोत्यांची मने जिंकली. सूत्रसंचालन शहाजी रंधवे सर आणि साईनाथ देवकर गुरुजी यांनी केले तर आभार मंगेश तरकसे सर यांनी व्यक्त केले.





