तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर - आतापर्यंत ४ हजार रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन - Saptahik Sandesh

तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर – आतापर्यंत ४ हजार रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (ता.२७) मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले.

या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड, सेवा मेडिकल चे प्रकाशजी मुनोत, उद्योजक रसिक जी मुथा, माजी नगरसेविका सौ.मेघा विजय देशपांडे, माजी नगरसेवक नारायण तात्या पवार यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.

यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर म्हणाले कि, या शिबिरांमधून आतापर्यंत 4000 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून, भविष्यातही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.

याप्रसंगी बोलताना शिवसेना तालुका अध्यक्ष सुधाकर काका लावंड यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.नारायण तात्या पवार यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.तसेच दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने अरुण तांगडे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी अमोल परदेशीं, नितीनशेठ दोशी, संग्राम देशमुख, ललितशेठ बलदोटा, विजय देशपांडे, दिनेश मुथा, केतन संचेती, गणेश बोरा,वर्धमान खाटेर,अनंत मसलेकर,भावेश कुंकूलोळ,कोल्हार जगदीश परदेशीं, संतोष बन्सीलाल कटारिया, दादा इंदलकर,गिरीश शहा, विजय बरीदे,चंद्रकांत काळदाते, प्रवीण गंधे, अभय शिंगावी, प्रीतम राठोड,यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे ॲड. संकेत खाटेर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!