नवरात्रोत्सवानिमित्त चिखलठाण नं २ येथे प्राथमिक शाळेत स्त्रीशक्तीचा जागर…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : नवरात्रोत्सव निमित्त जिल्हा परिषदेच्या चिखलठाण नं २ (ता.करमाळा) येथील प्राथमिक शाळेत रंगणार जागर स्त्री शक्तीचा नऊ दिवस महीलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांनी जिल्हा परिषद शाळेत नवरात्रीचे औचित्य साधत माता पालकांचा शाळेशी आसणारा संबंध अनोखी दृढ व्हावा या हेतूने सर्व वयोगटातील महिलावर्गासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रीच्या नऊ रंगाच्या सोबतच प्रतिदिन नव्या उपक्रमांची आखणी केलेली आहे.यामध्ये महिलांची हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य मार्गदर्शन , महाभोंडला, कन्यापूजन, जेष्ठ महिलांच्या भूतकाळातील गमतीजमती आणि चालू काळाशी समायोजन यांचे अनुभकथन, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचे मार्गदर्शन, व्यसनमुक्तीमध्ये महिलांची भूमिका ,विविध मनोरंजक खेळ ,जात्यावरील ओव्या या आणि अशा कार्यक्रमाची आखणी केलेली आहे.
चिखलठाण आणि परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे मत शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब आदलिंग यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!