कंदर येथे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन..

कंदर / संदेश प्रतिनिधी : संदीप कांबळे..
कंदर : कंदर (ता. करमाळा) येथे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक बबन मंगवडे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक नानासाहेब लोकरे कंदर सोसायटीचे माजी चेअरमन हरी शिंदे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख प्रमोद वागज कंदर सोसायटीचे संचालक संतोष शिंदे गणेश जगताप बबन माने रामभाऊ कदम रयत क्रांती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे धर्मराज लोकरे दत्ता चव्हाण गणेश यादव आदी उपस्थित होते.
